• काळानुरुप बदलत जाणारी तरुणाई : ऑन स्क्रीन अँड ऑफ स्क्रीन

  कोळशाच्या खाणीत दिवसभर दगड-कोळसा फोडून थकलेला विजय त्याच्या खोलीत खाटेवर पालथा पडून आहे. डोळे बंद करतो तेव्हा कामगारांचं अंगावर येणारं भेसूर स्वप्न अन् दचकून उठतो तेव्हा बाहेरही तोच कोलाहल. खाणीत काहीतरी अपघात झाल्याचा सिग्नल वाजतो अन् सारे कामगार त्या दिशेने पळू लागतात. खाटेवर पडलेला असताना गलितगात्र झालेला विजय हे बघून उठतो अन् तो सुद्धा अफाट वेगानं त्या खाणीच्या दिशेने धावू लागतो. साल १९७८, फिल्म ‘काला पत्थर’. बच्चनचा हा सिनेमा मी लहान असताना टीव्हीवर बघितलेला, पण त्याचं ते खाणीच्या दिशेने सुसाट धावणं बघून माझ्या बालमनाला तारुण्य म्हणजे काय असतं आणि कसं असू शकतं याची असंख्य खिडक्या उघडणारी झलक मिळाली होती. हा सीन मनावर इतका बिंबला गेला की आपण बच्चनसारखं कधी धावू…

 • नाईन्टीन नाईन्टी नाईन : ए लव्हस्टोरी (कथा)

  तर १९९९ च्या जानेवारी महिन्यात प्रिन्सीपल शेठ यांच्याबाबत एकाएकी आदर आणि प्रेमाची सुनामी आली, त्याला कारणीभूत त्यांनी केलेली अद्भूत घोषणा होती. ही गोष्ट त्या घोषणेविषयी किंवा प्रिन्सिपल शेठ यांच्याविषयी नाही, तर त्यानंतर झालेल्या माझ्या मनातल्या केमिकल लोच्याविषयी आणि त्यामुळे वर्षभर घडत गेलेल्या धाडस मालिकांविषयी आहे. १९९९ या सालात मी त्याकाळीही करियरच्या दृष्टीने मागास समजल्या गेलेल्या आर्ट्स शाखेत अकरावीत शिकत होतो. त्या वर्षी माझी गिटार वाजवण्यावर बऱ्यापैकी हुकूमत आली होती. माझ्या समवयस्क मुलांपेक्षा अधिक काळ मी एमटीव्ही पाहत होतो. डिस्कव्हरी चॅनल संपूर्णपणे हिंदी झाल्यानंतर तेही आवडीने सर्फ करीत होतो. एफटीव्हीवर चोवीस तास लाँजरी दाखवावे अशी माझ्या वयातील इतर तरुणांइतकीच माझीही तीव्र इच्छा होती. स्टार मुव्हीज, एमजीएम, एचबीओ आणि हॉलमार्कवर सिनेमामागून सिनेमा…

 • नकोशा वास्तवापासून दूर नेणाऱ्या स्वप्नांचा पाठलाग

  नव्वदचं दशक हे अमेरिकन चित्रपटसृष्टीतील इतिहासाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचं आणि क्रांतिकारी दशक आहे. मिरामॅक्स फिल्म्स, बॉब आणि हार्वे वाइन्स्टिन, क्वेंटिन टॅरंटिनो या नावांनी हे दशक केवळ गाजवलंच नाही तर स्टुडिओजमुळे निर्माण झालेली (किंबहुना केली गेलेली) मोनोपॉली तोडून इंडिपेंडेंट ऊर्फ ‘इंडी’ फिल्म चळवळीला नवीन आयाम प्राप्त करून दिले. १९८० च्या दशकापासून मिनिमल पातळीवर सुरु असलेल्या इंडिपेंडंट सिनेमा चळवळीला जवळपास दशकभराच्या अथक परिश्रमानंतर मोठ्या पातळीवर प्रसिद्धी मिळाली होती. १९९१ मध्ये ‘उटाह/यूएस फिल्म फेस्टिव्हल’ पुढे जाऊन नावाजला जाईल असा ‘सनडान्स फिल्म फेस्टिव्हल’ बनला होता. १९९४ मधील ‘पल्प फिक्शन’च्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘पाम डि’ऑर’ मिळवण्याने इंडी चळवळीत नवचैतन्य निर्माण झालं होतं. योगायोगाने ’९४ याच वर्षी ‘बिग सिक्स’ मेजर फिल्म स्टुडिओजपैकी एक असलेल्या ‘फॉक्स एंटरटेनमेंट…

 • कन्फेशन्स ऑफ अ प्रेडेटर (कथा)

  इंटर्न म्हणून लागल्यावर माझी ही पहिलीच असाइनमेंट होती. घाईघाईत निघालो ते ट्रॅव्हलिंगसाठी पैसे घेणंच विसरून गेलो. झक मारली. कॅब डेस्टिनेशनच्या जवळजवळ जात होती आणि मला आठवलं माझ्या झवाड्या सिनियरचं म्हणणं… आधीच ट्रॅव्हलिंगसाठी पैसे मागून घ्यायचे, जेवढे मिळतील त्यात भागवायचं… नंतर काही मिळणार नाही. आता इंटरव्ह्यू घेऊन झाल्यावर कसा परत जाणार होतो कुणास ठाऊक. शहराच्या अशा टोकावर या इसमाचा बंगला होता, जिथे फक्त दोन प्रकारचे लोक राहत… फुटपाथवर झोपणारे आणि आलिशान बंगल्यात गाडीने ये जा करत राहणारे… बाकी रहदारी नाहीच… रिक्षा-टॅक्सी मिळणंही महाकठीण… आता भेटली असती तरी माझे खिसे रिकामेच म्हणा… डेस्टिनेशनवर पोहोचलो. सुनसान… स्मशान बरं या पेक्षा. चार पाच बंगले होते, बाकीचे सारेच बंद दिसत होते. फक्त एक खंडहर टाईप…

 • चित्रपट, समीक्षक आणि प्रेक्षक

  मला नुकतंच कोणीतरी म्हणालं की, ‘काहीकाही सिनेमांना तू फारच लिनिअन्टली पाहतोस ब्वा!’, आणि मी दचकलो. खरं तर माझा समज होता की मी सगळ्याच सिनेमांना लिनीअन्टली पाहतो. आणि का पाहू नये? सिनेमा बनवणाऱ्यांची आणि माझी व्यक्तिगत दुश्मनी असण्याचं काहीच कारण नाही. चित्रपट बनवणारे तो बनवताना जर पुरेशा मेहनतीने बनवत असतील, तर समीक्षकाच्या भूमिकेतून तो पाहणाऱ्यांनीही पुरेसा समजूतदारपणा दाखवायला हवा, हे तर उघडच आहे. आता हे सगळं करुनही त्याला चित्रपट आवडला नाही, तर तसं सांगणं त्याचं कामच आहे,आणि त्याने ते पुरेशा स्पष्टवक्तेपणे करावं हे तर झालंच. ‘द पर्पज ऑफ अ मुव्ही क्रिटीक इज टु एन्करेज गुड फिल्म्स ॲन्ड टु डिस्करेज बॅड वन्स’, असं प्रसिद्ध चित्रपटसमीक्षक राॅजर इबर्ट यांनी म्हणूनच ठेवलंय, आणि त्या…

 • तारुण्यातला हॉलिवुडचा न पुसला जाणारा ‘डीऽऽऽप इम्पॅक्ट’

  केंद्र सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन’च्या २०१७ च्या अहवालानुसार १५ ते ३४ हे भारतीय युवक/युवतींचं तरुणपणाचं ठरवलेलं वय आहे. याचा विचार केला तर माझं तरुण असण्याचं वय कधीच सरलंय. मी तरुण राहिलो नाही असं केंद्र सरकारला वाटतंय म्हटल्यावर ते बरोबरच असणार. तारुण्य हे आकड्यांवर नसतं, असं आपण नेहमी म्हणतो. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ असा सुविचार शाळेच्या भिंतीवर वाचलेला आठवतो तेव्हा वाटतं हेही खरंय. तसं पाहिलं तर दोन्हीतही तथ्य आहे. सुविचार मनात बिंबवला तर वयाचा अडसर कधीच येणार नाही. सरकारी आकडे खरे मानले तर आपण नेमकं त्या काळात काय करत होतो याचं सिंहावलोकन करायची ही वेळ आहे असं वाटतं. मी हे आकडेच गृहीतक मानून बोलणार आहे.…

 • आश्वासक तरुणाईचा आशयघन सिनेमा

  २१ फेब्रुवारी २००६ मध्ये भारतीय मीडियाने पुरावलेला पिच्छा आणि केस तडीला नेण्याचा दृढ निश्चय यामुळे तब्बल सात वर्षांनी जेसिका लाल हत्याकांडाची केस कोर्टामध्ये पुन्हा सुरू झाली. राकेश ओमप्रकाश मेहरा-आमिर खान यांचा नुकताच २६ जानेवारी २००६ ला प्रदर्शित झालेला ‘रंग दे बसंती’ अजूनही थिएटरमध्ये होता. ‘अन्याय होत असेल तर तो सहन करण्यापेक्षा आपापल्या परीने उठाव केला पाहिजे’ ही भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि आझाद यांची शिकवण आदर्श मानून दिल्लीमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या कॉलेजवयीन मुलांची कथा ‘रंग दे बसंती’ सांगतो. या चित्रपटात असणाऱ्या ‘कँडल मार्च’च्या प्रसंगाचे पडसाद एवढे काही खोल उमटले की जेसिका हत्याकांडाच्या केसमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला संपूर्ण भारतीय तरुण वर्ग हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरला. परिणामी सब्रीना (जेसिकाची बहीण) आणि मीडियाच्या…

 • ५९६० (कथा)

  थरथरत्या चेहऱ्याने आणि भेदरलेल्या डोळ्यांनी तो बेसिनकडे पाहत होता. ते लालेलाल पाण्याने काठोकाठ भरून गेलं होतं. नाही, पाणी नाही. ते रक्त होतं. लालजर्द. बेसिनच्या कडेवरून खालच्या पांढऱ्याशुभ्र टाईल्सवर ओघळत होतं. बाथरूमचं गुलाबपाकळ्यांनी आच्छादलेलं फ्लोअर या ओघळणाऱ्या रक्तामुळे आणखीनच लालभडक झालेलं होतं. एकंदरीत सगळंच असह्य होतं. त्याला तिथून निघायचं होतं. पण बेसिनवरील हात आणि त्या रक्ताच्या डबक्यावर खिळलेली नजर हटायला तयार नव्हती. हळूहळू त्या डबक्यातून दोन गुलाबी वक्ष बाहेर आले. मग पूर्ण छाती. मग एका सुंदर मुलीचा चेहरा. त्याचं शरीर बधीर पडू लागलं होतं. मग त्या मुलीचे हात डबक्यातून बाहेर आले. त्या हातांनी त्याचा चेहरा पकडला आणि त्याला झपकन डबक्यात ओढून घेतलं. भयंकर घाबरून तो स्वप्नातून जागा झाला. खोलीतल्या अंधाराने त्याची…

 • गोईंग होम

  दिग्दर्शक विकास बहल यांची ‘गोईंग होम’ ही शॉर्ट फिल्म जेव्हा पहिली होती तेव्हा आपण एक फँटसी फिल्म पाहत आहोत असं वाटून गेलं आणि इथेच आपण स्त्री म्हणून अजूनही किती इन्सिक्युअर आहोत ह्याची जाणीव झाली. वरवर पाहता साधीशी गोष्ट. ‘आलिया’, एक तरुण मुलगी रात्रीच्या वेळेस एकटी गाडीतून जात असताना तिची गाडी बंद पडते. रस्ता सुनसान… तिला एक गाडी दिसते रस्त्याच्या त्या बाजूला. त्यात पाच तरुण मुलगे असतात. त्यांच्या डोळ्यात एक प्रेक्षक म्हणून आणि एक स्त्री म्हणून मला वासना खच्चून भरलेली दिसते. ते त्यांची गाडी तिच्या गाडीच्या अगदी जवळ आणतात आणि थांबवतात . इथे माझं हृदय अतिप्रचंड वेगात धडधड करायला लागतं. आलियाने ह्या लांडग्यांना बघून पटकन गाडीत बसून जावं आणि दारं लॉक…

 • चढ़ती लहरे लांघ ना पाए, क्यूँ हांफती सी नाव हैं तेरी

  मध्यरात्र झालेली. तो पलंगावर छताकडे एकटक पाहत पडलाय. त्याची नजर एकदम शून्यात आणि डोक्यात हजारो विचार घोळत आहेत. आपण आयुष्यात काय करतोय? का करतोय? हेच करण्यासाठी जन्म घेतलाय का आपण? हेच करण्यात आयुष्य जाणार का? आणि हे सगळं कशासाठी? एवढी लाचारी कशासाठी? आपल्यालाही आनंदी आयुष्य जगण्याचा हक्क आहे ना? या विचारांच्या डोहात बुडालेला असतानाच बाजूलाच झोपलेली बायको त्याचा खांदा जोरात हलवून त्याला भानावर आणते आणि पाळण्यात रडत असलेल्या त्याच्या बाळाकडे बोट करते. तो बाळाला पाळण्यातून काढून पलंगावर पती-पत्नीच्या मध्ये झोपवतो. बायको त्याला विचारते, “काय हो? परत तेच विचार का?” तो म्हणतो, “काही वेळापूर्वी होते, पण आता घराची, गाडीची ईएमआय, महिन्याचा खर्च, बाळ उद्या शाळेत जाईल त्याच्या फीज, उद्याची कामं, हे…