• करन शेरगिल आणि सिड मेहरा, एकाच नावेचे प्रवासी

    ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’ साधारण चाळीस वर्षांपूर्वी जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं हे गाणं आजही तितकंच समर्पक आहे. विशेषतः वारसाहक्काने मिळालेल्या बापाच्या पैश्यांच्या कुबड्या घेऊन चालणाऱ्या आणि फुकटच्या एसी कारमधून फिरताना दुनियादारीची तसूभरही झळ न लागलेल्या नव्या पिढीतल्या काही तरुणांना. हाताला धरून चालायला शिकवल्यानंतरही आपल्या बापाचे एक अदृश्य बोट त्यांनी कायम पकडलेलं असतं. ते सोडल्याशिवाय स्वतःच्या अस्तित्त्वाचा शोध लागत नसतो, हे जेवढ्या लवकर कळतं, तितकाच प्रवास स्वावलंबी आणि सुकर होतो. चित्रपट हे सध्याच्या काळातील अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपल्या नकळत आपल्यामार्फत त्याचा चांगला-वाईट परिणाम आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर होत राहतो. २००० सालानंतर चित्रपटात संहितेच्या आणि विषयाच्या बाबतीत आमूलाग्र बदल झाले. विशेषतः तरुणांच्या मानसिकतेवर, स्वतःच्या शर्तींवर जगण्याच्या अट्टाहासावर, बदलत्या नातेसंबंधांवर,…